Monday, 8 June 2020

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ‘मंगली’ श्री. संजीवकुमार राठोड निर्मित आणि दिग्दर्शित ‘आमदार निवास’ चित्रपटातून मराठीत करणार पदार्पण

एका सच्चा कलाकाराला त्याच्या अंगी असलेले गुण आणि कौशल्य जगासमोर दाखवण्यासाठी एका माध्यमाची आणि पाठिंब्याची गरज असते. नावातच मंगल असलेल्या ‘मंगली’ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील गायन क्षेत्रातील नवीन आकर्षण बनली आहे. मंगलीचे मूळ नाव सत्यवती मुडावत, जन्म आंध्रप्रदेश सध्या तेलंगना राज्यातला. जन्मापासूनच स्वत:च्या अस्तित्वासाठी, हक्कासाठी आणि प्रेम मिळवण्यासाठीचा मंगलीचा संघर्ष ते टॉलीवूडमधील सप्तगिरी, शैलेजा रेडी अल्लुडू, राज महाल, निधी नाडीओके  कथा व अला वैकुंठरमल्ले (२०१९) या सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील रामुलो रामला या गाण्याला मिळालेले तब्बल २०० मिलिअन व्ह्युजच्या रुपातून मिळालेले यश… असा हा मंगलीचा यशाच्या मार्गाकडे होणारा प्रवास आता लवकरच आणखी…